Sunday 1 January 2012

उपनयन संस्कार

उपनयन संस्कार
उपनयन संस्काराने ब्रह्मचर्य आश्रम स्विकारुन विद्येस आरंभ करावयाचा असतो. म्हणून या संस्काराला व्रतबंध (व्रतनियमांचे बंधने) असेही म्हणतात.
उपनयन संस्कार व विवाह संस्कार या दोन्ही संस्कार या दोन्ही संस्कार आधी ग्रहांचे अनुकूलतेसाठी ग्रहयज्ञ करायची पद्धत आहे.
उपनयन यात  उप अधिक नयन असे दोन शब्द आहेत. उप शब्दाचा अर्थ जवळ आणि नयन शब्दाचा अर्थ नेणे असा आहे. गायत्री मंत्र शिकविण्यासाठी जवळ नेणे.
वयाचे गर्भापासून आठवे वर्षी सुमूहूर्तावर गुरुकूल पाहून उपनयन संस्कार करावा.

उपनयन संस्काराचे मुख्य विधी.
मातृभोजन - मुंज झाली की बटू गुरुगृही शिक्षणासाठी जाणार असतो. हा संकेत आहे. त्यामुळे आईचे हातचे जेवण बटू शेवटचे जेवतो. सोबत आठ बटूंना जेवण देतो. म्हणून याला अष्टवर्ग असेही म्हणतात.

मुंज लावणे - मुंज करणारा पिता व कुमार यांच्यामध्ये अंतर्पाट धरुन मंगलाष्टके म्हणतात. पिता हा मंगलाष्टके शिकविणारा पहिला गुरु (आचार्य) समजतात. त्यामुळे बटूचा पहिला गुरु पिताच असतो.

लंगोटी व वस्त्रधारण  -
कौपिन म्हणजे लंगोटीकरिता त्रिगुणित दोरा कमरेस बांधिला जातो. व लंगोटी धारण करतात.
       उपनयन हा दुसरा जन्म म्हणजे दुसर्‍या जन्माच्या गर्भाच्या पिशवीबद्दल मोठे असे शुभ्रवस्त्र पंचा धारण करावे.
नंतर हरणाचे चर्म धारण करतात.

यज्ञोपावीत धारण *
गायत्रीच्या दहा मंत्रांनी अभिमंत्रीत करुन उपवीत धारण करावे. जानवे नऊ धाग्यांपासून बनविले असतात. प्रत्येक तंतूवर वेगवेगळ्या देवता असतात. १) ओंकार, अग्नि, नाग, सोम, पितर, प्रजापती, वायू, यम, विश्वेदेव अश्या नऊ देवता व तंतूची एकेकात ३ तंतू असे धागे विणतात. त्यांच्यातील एकावर ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद असे क्रमाने स्थापना करुन हे तीन्ही तंतू एकत्रीत करुन त्रिसुत्री करुन गाठ मारतात. तिला ब्रहमगाठ म्हणतात. व अथर्ववेद गाठीवर कल्पिला जातो. नंतर अवक्षारण करणे. गायत्री मंत्र ग्रहण, होमाचा विधी, विभूतीग्रहण दंडधारण विधी, ब्रम्हचर्य व्रतोपदेश भिक्षाग्रहण असे महत्त्वाचे विधी होतात.
       वरील सर्व विधी पूर्वी प्रमाणे आताही होतात. परंतु सदयकालीन फक्त संस्कार हा संस्कार म्हणूनच होतो. संस्कारात गौण गोष्टीला जास्त महत्व दिले जाते. परंतू आताही बटूने सर्व उत्तेजक गोष्टीपासून अलिप्त राहून योग्य नियमाने वागून शिक्षण घेतले तरच त्याचे भावी आयुष्य यशस्वी होईल.
अनुप्रवचनाय होम, मेधाजनन विधी झाला. देववोत्थापन होते व उपनयन संस्कार सांगता होते.

No comments:

Post a Comment