Wednesday 3 August 2011

वर्धापन संस्कार (वाढदिवस)


वर्धापन संस्कार (वाढदिवस)
       ज्या दिवशी जन्म झाला त्या दिवसाला वाढदिवस असे म्हणतात. वाढदिवसाचा विधी करणे तो वर्षपर्यंत दर एक मासिक जन्मतिथीचे  दिवशी करावा. वर्षांनंतर दरएक वर्षी जन्मतिथीचे दिवशी करावा. जन्मतिथी दोन दिवस असेल तर ज्या दिवशी जन्मनक्षत्राचा योग असेल ती घ्यावी. दोन दिवस जन्मनक्षत्राचा योग असेल किवा दोनही दिवशी  नसेल तर सुर्योदयकाल व्यापिनी अशी चार घटिकाहून अधिक असेल ती घ्यावी. चार घटिकाहून कमी असल्यास पूर्व दिवसाची घ्यावी. जन्ममास अधिकमास आला असतां शूद्धमासात दरएक वर्षाचा वर्धापनविधी करावा, अधिकमासात करु नये.
       आपल्या इष्ट, कुल देवतांची यथायोग्य आठवण करुन मार्कंडेय पूजन करावे. सप्तचिरंजीव, अश्वत्थामा, बली, व्यास, हनूमान, विभिषण, कृपाचार्य, परशुराम, मार्कंडेय यांचे स्मरण तरी करावे.
बालकाला मंगलस्नान करवून तिलकधारण नवीन कपडे वगैरे धारण करुन वरील पूजा करावी. देवतांना नैवेद्य करुन बानकास तिल, गूडयुक्त दूध प्राशन करवावे.
औक्षण करवावे.
विधियुक्त करणे झाल्यास संकल्पपूर्वक पूण्याहवाचन, वरील देवतांचे पूजन तसेच आयुष्यवृद्धीकरिता दूर्वाहोम वेगैरे करावा.

कर्णवेध संस्कार, सूर्यावलोकन निष्क्रमण संस्कार, अन्नप्राशन संस्कार

कर्णवेध संस्कार
       उपसंस्कार अंगभूत हा संस्कार आहे. कानाच्या पाळीला भोक पाडणे म्हणजे कर्णवेध. रोगापासून रक्षण होऊन अलंकार धारण करणे याकरिता हा संस्कार सांगितला आहे. हिदू धर्मात बहुसंख्य व्यक्तींचे कान टोचलेले असतात. म्हणून त्यांना *विध* असे म्हणण्याची प्रथा आहे.
       कानाच्या पाळीमागे उपजतच असलेल्या सूक्ष्म खोलगट भागात दमा, खोकला, क्षय या रोगांशी संबधित नसा असतात. तो भाग (पंक्चर) वेध करताच तो रोग नाहिसा होतो.
कर्णवेधावाचून बालकाला पाहिले असता पूर्वपूण्याचा नाश होतो.
नामकरण संस्काराएवढेच महत्व कर्णवेध संस्काराला आहे.

सूर्यावलोकन निष्क्रमण संस्कार
सूर्यावलोकन संस्काराबरोबरच निष्क्रमण संस्कार करावा. चवथ्या किवा सहाव्या महिन्यात माझ्या बालकाचे आयुष्य आणि श्री म्हणजे लक्ष्मीची वृद्धी. बीजगर्भापासून झालेल्या दोषाचा नाश करण्यासाठी व परमेश्वर प्रीतीकरिता निष्क्रमण म्हणजे बाहेर निघणे हा संस्कार करतो. असा संकल्प करुन चंद्र सूर्य आठ दिशांचे आठ दिक्पाल व आठ दिशा गगन इतक्यांजवळ मी बालकाला दिले. अशी भावना मनात ठेवून त्या त्या देवतांचे पूजन करावे. किवा देवदर्शन इष्टदेवता कुलदेवता यांचे दर्शन करवावे.

अन्नप्राशन संस्कार
       ह्या संस्काराने आईच्या गर्भात घडलेल्या मलमूत्रादी भक्षणाचा दोष नाहीसा होतो. असे सांगतात. म्हणून हा संस्कार करण्याची ही वहिवाट आहे. काहीजण गणपतीपूजन पूण्याहवाचन पर्यंत कर्म करतात. बालकाला दागिना (अलंकार) घालून मनाप्रमाणे इष्टदेवता कुलदेवतांची आठवण करावी. त्या देवतांच्या सानिध्यात आईच्या मांडीवर पूर्व दिशेला तोंड करुन बसलेल्या बालकास प्रथम अन्नप्राशन करवावे दही, मध, तूप ह्यांनी युक्त असे अन्न घेऊन पहिला घास भरवावा.
       नंतर जेवण झाल्यावर बालकाला भूमीवर बसवावे. त्याच्यापूढे पूस्तके, शस्त्रे, वस्त्रे इत्यादिक शिल्पसाधने उपजिवीकेची परिक्षा पहाण्यासाठी ठेवावीत. बालक स्वेच्छेने ज्या वस्तूस प्रथम हात लीवील ते त्याचे अपजिवीकेचे साधन होईल असे समजावे असे म्हणतात.
       बालकाला अन्न पचविण्याची शक्ती येईल त्यावेळी हा संस्कार करावा. ६,,९ अशा महिन्यात अन्न पातळ पदार्थ खाण्यास बालक सरासरी योग्य होतो.

प्रथम केशकर्तन (जावळ काढणे.)
       बालकाचे डोक्यावरील केसाचे जावळ मोठ्या सावधतेने काढून डोक्यास मलई लावली असतां डोक्याचे त्वचेचे विकार दूर होतात.डोक्यातील सर्व ीाागाला रक्त पोहोचून नवीन जे केस येतात ते पूष्ट होऊन त्याचे बूड मजबूत होतात.
मुलाचे जावळ जन्मदेवापासून सम म्हणजे (२-४-६) व मूलीचे (३-७-९) अश्या विषम महिन्यात काढावे.
मुलीचे जावळ काढण्याचा संप्रदाय कर्नाटक प्रांतात आहे.