Wednesday 3 August 2011

वर्धापन संस्कार (वाढदिवस)


वर्धापन संस्कार (वाढदिवस)
       ज्या दिवशी जन्म झाला त्या दिवसाला वाढदिवस असे म्हणतात. वाढदिवसाचा विधी करणे तो वर्षपर्यंत दर एक मासिक जन्मतिथीचे  दिवशी करावा. वर्षांनंतर दरएक वर्षी जन्मतिथीचे दिवशी करावा. जन्मतिथी दोन दिवस असेल तर ज्या दिवशी जन्मनक्षत्राचा योग असेल ती घ्यावी. दोन दिवस जन्मनक्षत्राचा योग असेल किवा दोनही दिवशी  नसेल तर सुर्योदयकाल व्यापिनी अशी चार घटिकाहून अधिक असेल ती घ्यावी. चार घटिकाहून कमी असल्यास पूर्व दिवसाची घ्यावी. जन्ममास अधिकमास आला असतां शूद्धमासात दरएक वर्षाचा वर्धापनविधी करावा, अधिकमासात करु नये.
       आपल्या इष्ट, कुल देवतांची यथायोग्य आठवण करुन मार्कंडेय पूजन करावे. सप्तचिरंजीव, अश्वत्थामा, बली, व्यास, हनूमान, विभिषण, कृपाचार्य, परशुराम, मार्कंडेय यांचे स्मरण तरी करावे.
बालकाला मंगलस्नान करवून तिलकधारण नवीन कपडे वगैरे धारण करुन वरील पूजा करावी. देवतांना नैवेद्य करुन बानकास तिल, गूडयुक्त दूध प्राशन करवावे.
औक्षण करवावे.
विधियुक्त करणे झाल्यास संकल्पपूर्वक पूण्याहवाचन, वरील देवतांचे पूजन तसेच आयुष्यवृद्धीकरिता दूर्वाहोम वेगैरे करावा.

कर्णवेध संस्कार, सूर्यावलोकन निष्क्रमण संस्कार, अन्नप्राशन संस्कार

कर्णवेध संस्कार
       उपसंस्कार अंगभूत हा संस्कार आहे. कानाच्या पाळीला भोक पाडणे म्हणजे कर्णवेध. रोगापासून रक्षण होऊन अलंकार धारण करणे याकरिता हा संस्कार सांगितला आहे. हिदू धर्मात बहुसंख्य व्यक्तींचे कान टोचलेले असतात. म्हणून त्यांना *विध* असे म्हणण्याची प्रथा आहे.
       कानाच्या पाळीमागे उपजतच असलेल्या सूक्ष्म खोलगट भागात दमा, खोकला, क्षय या रोगांशी संबधित नसा असतात. तो भाग (पंक्चर) वेध करताच तो रोग नाहिसा होतो.
कर्णवेधावाचून बालकाला पाहिले असता पूर्वपूण्याचा नाश होतो.
नामकरण संस्काराएवढेच महत्व कर्णवेध संस्काराला आहे.

सूर्यावलोकन निष्क्रमण संस्कार
सूर्यावलोकन संस्काराबरोबरच निष्क्रमण संस्कार करावा. चवथ्या किवा सहाव्या महिन्यात माझ्या बालकाचे आयुष्य आणि श्री म्हणजे लक्ष्मीची वृद्धी. बीजगर्भापासून झालेल्या दोषाचा नाश करण्यासाठी व परमेश्वर प्रीतीकरिता निष्क्रमण म्हणजे बाहेर निघणे हा संस्कार करतो. असा संकल्प करुन चंद्र सूर्य आठ दिशांचे आठ दिक्पाल व आठ दिशा गगन इतक्यांजवळ मी बालकाला दिले. अशी भावना मनात ठेवून त्या त्या देवतांचे पूजन करावे. किवा देवदर्शन इष्टदेवता कुलदेवता यांचे दर्शन करवावे.

अन्नप्राशन संस्कार
       ह्या संस्काराने आईच्या गर्भात घडलेल्या मलमूत्रादी भक्षणाचा दोष नाहीसा होतो. असे सांगतात. म्हणून हा संस्कार करण्याची ही वहिवाट आहे. काहीजण गणपतीपूजन पूण्याहवाचन पर्यंत कर्म करतात. बालकाला दागिना (अलंकार) घालून मनाप्रमाणे इष्टदेवता कुलदेवतांची आठवण करावी. त्या देवतांच्या सानिध्यात आईच्या मांडीवर पूर्व दिशेला तोंड करुन बसलेल्या बालकास प्रथम अन्नप्राशन करवावे दही, मध, तूप ह्यांनी युक्त असे अन्न घेऊन पहिला घास भरवावा.
       नंतर जेवण झाल्यावर बालकाला भूमीवर बसवावे. त्याच्यापूढे पूस्तके, शस्त्रे, वस्त्रे इत्यादिक शिल्पसाधने उपजिवीकेची परिक्षा पहाण्यासाठी ठेवावीत. बालक स्वेच्छेने ज्या वस्तूस प्रथम हात लीवील ते त्याचे अपजिवीकेचे साधन होईल असे समजावे असे म्हणतात.
       बालकाला अन्न पचविण्याची शक्ती येईल त्यावेळी हा संस्कार करावा. ६,,९ अशा महिन्यात अन्न पातळ पदार्थ खाण्यास बालक सरासरी योग्य होतो.

प्रथम केशकर्तन (जावळ काढणे.)
       बालकाचे डोक्यावरील केसाचे जावळ मोठ्या सावधतेने काढून डोक्यास मलई लावली असतां डोक्याचे त्वचेचे विकार दूर होतात.डोक्यातील सर्व ीाागाला रक्त पोहोचून नवीन जे केस येतात ते पूष्ट होऊन त्याचे बूड मजबूत होतात.
मुलाचे जावळ जन्मदेवापासून सम म्हणजे (२-४-६) व मूलीचे (३-७-९) अश्या विषम महिन्यात काढावे.
मुलीचे जावळ काढण्याचा संप्रदाय कर्नाटक प्रांतात आहे.

Saturday 23 July 2011

जातकर्म संस्कार

       प्रसुत झाल्यानंतर नालच्छेदनापूर्वी हा संस्कार करावा.
       या संस्काराचा मुख्यत्वे उद्देश हा आहे की गर्भाशयामध्ये असताना तेथील उदकाचे वगैरे पान करावे लागल्यामुळे जो दोष उद्भवला असेल त्याचे निरसन होऊन जन्मलेल्या बालकाची शारीरीक व मानसिक उन्नती होऊन आयुष्यवृद्धी व्हावी म्हणून सोने मध सोने मधात उगाळून रासायनिक औषध बालकाला चाटण करावे. देशेालानूसार नालच्छेदनापूर्वी हा संस्कार होत नाही पण नंतर सोने मध चाटण मात्र करता येते. बारशावेळीही करता येते. पाचव्या किवा सहाव्या दिवशी परंपरेनुसार षष्ठीपूजन होते. पाचवी (पाची) षष्ठीदेवीचे पूजन होते. या पूजनामध्ये विघ्नेश, जन्म देणारी षष्ठीदेवी आणि जिवंतीका यांचे पूजन होते. काही घराण्यात वाजती पाचवी (पाची) असते. प्रत्येक संस्कारात रितीरिवाज कुलपरंपरा यांचा पगडा असतो. काही ठिकाणी पाचव्या दिवशी बाळ बाळंतीण ज्या घरात असते. त्या घराबाहेर चारी कोपर्‍यात बाहरुन *काजरा* वृक्षाच्या खुंट्या मारतात. घरात अग्नि चूलीमध्ये रात्रभर पेटत ठेवतात. पहाटे सुर्योदयापूर्वी पूजा विसर्जित केली जाते.
या सर्वामागे ष्ष्ठीदेवी (सटवी) मुलाचे भाग्य लिहायला येते. तिचा रात्री जागर बाहेरील वाईट शक्तींचा त्रास जावा अशीच कल्पना दिसते.
       यापुढे जननाशौच समाप्तीनंतर अकरावे किवा बारावे दिवशी जन्मलेल्या बाळाला जन्मलेल्या वेळी नक्षत्रदोष वगैरे असेल तर शांती विधी करावा किवा बाळ बाळंतीणीची तब्येत पाहुन यथावकाश शांतीकर्म करावे.

नामकरण संस्कार (बारसे)
आयुष्याची वृद्धी होऊन व्यवहार सुरळीत चालणे असा नामकरण संस्कार करण्याचा उद्देश आहे.
काही ठिकाणी गणपतीपूजन पूण्याहवाचन वगैरे विधी करतात.
कुळाचार, परंपरा यांना अनुसरुन मुलाचे बारसे १२व्या दिवशी मुलीचे बारसे १३व्या दिवशी करतात.
यामध्ये पाळणा सजवून सौभाग्यवती स्त्रिया, मुलाची आत्या वगैरे नाव ठेवतात.
नाव ठेवणे यामध्ये कुलदेवता नाम, मास नाम, नाक्षत्र नाम, व्यवहारासंबधी नाम अशी चार ठेवावीत.
१) कुलदेवता (कुलदेवतेचे नाव) भक्त असे म्हणून नाव लिहावे.
२) बारा महीन्यांची बारा नावे पुढीलप्रमाणे आहे.
१. कृष्ण, २) अनंत, ३) अच्युत, ४) चक्री, ५)वेंकुठ, ६)जनादन, ७) उपेंद्र, ८)यज्ञपुरुष, ९) वासुदेव, १०) हरि, ११) योगीश, १२) पुंडरीकाक्ष
याप्रमाणे नामकरण संस्कार होतो.

Thursday 14 July 2011

माझे मनोगत


।। श्री गजानन प्रसन्न ।।
      मी फोटोग्राफी या व्यवसायात आहे. विविध धार्मिक कार्यक्रमांचे छायाचित्रण करताना माझी या विषयातील अभिरुची वाढली. विशेषतः लग्नसमारंभातील विविध प्रांतांतील विधींतील भिन्नता, अपुर्‍या माहितीमुळे होणारा गोंधळ हे सगळे पाहता, याचे कुठेतरी  विस्तृत माहितीपर विश्लेषण व्हावे, अशी मला इच्छा झाली. या संदर्भात माझ्या स्नेही मित्र पुरोहीतांकडून मी माहिती मिळवत गेलो. लग्नविधी हा सोळा संस्कारांपैकी एक संस्कार आहे. मग हिदू धर्मातील या सोळा संस्कारांचीच माहिती आपण ब्लॉगस्पॉटवर टाकावी. या हेतुने मी ही माहिती क्रमशः आपल्या समोर मांडत आहे.
       माझे मित्र उमेश जोशी. रा. कोर्‍याची वाडी, दाभोली, ता. वेगुर्ला, जि. सिधुदुर्ग यांनी मला ही माहिती पुरविण्याची कृपा केली. त्यांचे खूप आभार.
       वाचकांस दिलेली माहिती लोकांपर्यंत पोहोचून ती सर्वश्रृत व्हावी हाच उद्देश. दिलेल्या माहितीतील त्रूटी, चुका वाचकांनी अवश्य सुचवाव्या. आपण दिलेल्या माहितीनुसार चुका सुधारल्या जातील.
       माझ्या या छोट्याशा उपक्रमाला आपण अवश्य प्रतिसाद देवून आपल्या आप्त, स्नेहींमध्ये ही माहिती नक्कीच पसरवाल हीच अपेक्षा.
आपला मित्र,
निलेश चेंदवणकर, 
इंद्रनिल डिजीटल फोटो स्टूडिओ,वेंगुर्ला
फोन-९४२२९६४४१६
             ।।श्री गौतमेश्वर प्रसन्न।।
              गर्भाधानं पुंसवनं सीमंतोन्नयनं तथा ।
              जातकं नामसंस्कारो निष्क्रमश्र्चान्नभोजनं ।
              चौलेर्मोपनयनं वेदव्रतचतुष्टयं ।
              केशांतस्नान मुद्वाहः संस्काराः षोडश स्मृताः ।
       ‘नमस्कार’. हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे आपल्या संस्कृतीत वरील सोळा संस्कार सांगितले आहेत. कित्येक ग्रंथकारांनी ४८, कोणी २५ असे संस्कार सांगितले आहेत.
       संस्कार म्हणजे काय तर गर्भधारणेपासून विवाहापर्यंतच्या काळात आई, वडील, आचार्य यांच्या कडून पूत्र किवा कन्या यांच्यावर त्यांच्याकडून सात्विक कृती व्हावी म्हणून जे विधी केले जातात. त्याला संस्कार असे म्हणतात. किवा संस्कार म्हणजे शुद्ध करणे, चांगले करणे. वैगुण्य दूर करुन तिला रुप देणे थोडक्यात ज्या क्रियेच्या योगाने मनुष्याच्या ठिकाणी सद्गुणांचे संवर्धन होते त्याला संस्कार असे म्हणतात.
       सध्याच्या काल परिस्थितीप्रमाणे सर्व संस्कार विधी जसेच्या तसे आचरणात आणणे शक्य नसले तरी संस्काराचा मूळ उद्देश्य त्यांचे विधी जाणून घेतल्याने संस्कार कर्माची सार्थकता होते. संस्कार हे केवळ रुढी परंपरा म्हणून करण्यापेक्षा त्यांचे हेतू त्यामागील भावना जाणून ते व्हावेत. अशी अनेकांची इच्छा असते.
       ज्यावेळी एखाद्या घरात शुभकार्य असते त्यावेळी या गोष्टी सविस्तर माहित असल्यास कार्य सुव्यवस्थित पार पडते असा अनुभव आहे. म्हणून प्रत्येक संस्कारात काय वैशिष्टय आहे याची पूर्वकल्पना असणे अत्यंत आवश्यक आहे. आपल्या पूर्वसूरींनी संस्कार योजना केली ती बहुत विचारपूर्वकच केलेली आहे. कुंभार जसा मातीच्या गोळ्याला आकार देतो, तसे आपली संतती योग्य झाली पाहिजे.
       तर प्रथमपासून म्हणजे गर्भाधान संस्कारापासून काळजीपूर्वक ते संस्कार समजावून घेतले तर त्यातील गांभिर्य आपणाला निश्चितच समजेल. असे मला वाटते. मी काही कोणी यामधील तज्ञ जाणकार नाही आजही या क्षेत्रात अनेक जाणकार, तज्ञ आहेत. परंतु गौतमेश्वर प्रेरणेने ही संस्कार माहिती सर्वांना मिळावी. असे वाटले म्हणून लिखाणप्रपंच हाती घेतला.
       माझ्याकडील उपलब्ध पुस्तकानुसार लिहीतो आहे. ज्ञानसागर प्रचंड मोठा आहे. त्यात मी हा केलेला अल्पसा लेखमालेचा प्रयत्न समजावा.
 श्री उमेश बाळकृष्ण जोशी, दाभोली

पुंसवन , अनवलोभन , सीमंतोन्नयन संस्कार

पुंसवन - पुमान म्हणजे वीर्यवान (बलवान) संतती ज्या संस्काराच्या योगाने होते त्याला पुंसवन म्हणतात.
हा संस्कार गर्भाचे स्पष्ट ज्ञान झाल्यावर २,,६ किवा ८ यातून कोणत्याही महिन्यात करावा.
किवा सिमंतोन्नयन संस्काराबरोबर करावा. यामध्ये अनवलोभन संस्कार मध्ये येतो. तो ही काहीजण करतात. सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे उपसंस्कारातील संस्कार समजावा. माझ्या पत्नीचे ठिकाणी उत्पन्न होणार्‍या सर्व गर्भांचे बीजासंबंधी व गर्भांसंबंधी देवांचा परिहारपुर्वक पूरुष देवतेच्या ज्ञानोदयाच्या प्रतिबंधकाचा परिहार व्हावा म्हणून पुंसवन संस्कार व अनवलोभन संस्कार तसाच माझ्या पत्नीचे ठिकाणी गर्भाची वृद्धी होण्यास प्रतिबंध करणार्‍या मांस, रुधिरप्रिय असणार्‍या राक्षसींच्या समुदायांचा नाशपूर्वक क्षम व सकल सौभाग्याचे मुलकारण महालर्क्ष्मीच्या प्रवेशद्वाराने प्रत्येक गर्भामध्ये बीज आणि गर्भ यांपासून उत्पन्न होणार्‍या पापांचा नाश करणार्‍यांचा अतिशयद्वाराने स्त्रीसंस्काररुप सीमंतोन्नयन नावाचा संस्कार असे पुंसवन, अनवलोभन, सिमंत असे तीनही संस्कार करतो.
अनवलोभन - अनवलोभन म्हणजे पतन ते न होणे म्हणजे अनवलोभन म्हणजे गर्भपतन न होऊ देणे आहे. म्हणून पुंसवन व अनवलोभन हे संस्कार पहिल्या गर्भाचे केले तथापि हे गर्भसंस्कार असल्यामुळे दर एक गर्भाचेही करावे. पुंसवन, अनवलोभन संस्कारामुळे तीन हेतु साध्य होतात.
१) गर्भ बलवान होतो. २) गर्भपात होत नाही. ३) बालक पूर्ण दिवस झालेनंतर जन्माला येते.
सामंतोन्नयन - मस्तकातील पंचसंधीस सीमंत म्हणतात. त्याचे रक्षण करण्याकरिता हा संस्कार आहे.
मस्तकातील मानसीक शक्तीवर प्रभाव पाडण्यासाठी चांगला आचार विचार आवश्यक आहे.
गर्भवती स्त्रीचे आचार आहाराचे प्रतिबिब गर्भस्थ बालकावर पडते. गर्भस्थ बालकाचे मन दृढ करण्याकरितागर्भवतीचे मन दृढ व शांत केले पाहिजे. एकंदरीत आपणाला जसा बालक पाहिजे तसे गर्भवतीचे मन केले पाहिजे. गर्भवतीचे मनाच्या विचाराने संस्काराने युक्त असे बालकही त्या मनाच्या संस्काराने युक्त होईल.
गर्भवती आपले शारीरीक व मानसिक सर्व शक्ती गर्भस्थ बालकाला देऊ शकते. म्हणून गर्भस्थ बालक विशेष सामर्थ्यवान करुन त्याची काया पालटण्याचे गर्भवती हे एक मोठे साधन आहे.
लौकीक दृष्टीने शालेय शिक्षणाने मुलाच्या शिक्षणाचा आरंभ होतो. परंतु संस्कार/शिक्षण हे गर्भात असल्यापासून चालू असते.
       वरील तीनही संस्कारात होमद्वारा प्रजापती, धाता, राका, विष्णू, प्रजापती अशा देवतांना संतुष्ट केले जाते.
कुलपरंपरेनुसार माहेरची, घरची ओटी भरणे, फुले माळणे अशाप्रकारचे कार्यक्रम केले जातात.
८व्या महीन्यात *विष्णूबली* नामक संस्कारही आहे. सुलभ प्रसूतीसाठी हा संस्कार केला जातो.

Sunday 3 July 2011

गर्भाधान संस्कार



‘गर्भाधान’
       हे अत्यंत महत्वाचे व जबाबदारीचे कर्तव्य आहे. हा संस्कार पतीने भार्येच्या ठिकाणी करावयाचा असतो. हा संस्कार मुख्यतः पतीपासून भार्या (पत्निच्या) ठिकाणी  पुढे होणार्‍या संततीचा आहे. म्हणून हा क्षेत्रसंस्कार. क्षेत्र म्हणजे बीज पेरण्याचे स्थान अर्थात गर्भाची स्थापना. गर्भाचे पोषण व वाढण्याची जागा. शेतकर्‍याने पेरणीचीच काळजी घेतली नाही, तर येणार्‍या पिकापासून लाभ संभवत नाही. त्यासाठी हा संस्कार महत्वाचा आहे. हा संस्कार रात्रीच करावयाचा असतो.
       हा संस्कार ऋतुकालाचे ठायी करावा. ऋतुकाल म्हणजे रजोदर्शन (मासिक पाळी) झाल्यापासून प्रथम सोळा रात्री होय.  त्यातील पहिल्या ४ व ११, १३ रात्री सोडून ज्या १० रात्री या संस्कारात प्रशस्त आहेत.
       चतुर्थ रात्री गमन (रतिक्रिया) केल्यास पुत्र होतो, पण तो अल्पायुषी व धनहीन होतो.
पंचम रात्री गमन केल्यास पुत्रवती कन्या होते. सहाव्या रात्री मध्यम पूत्र. सातव्या रात्री प्रजा न होणारी कन्या. ८व्या रात्री गमन केले असता ईश्वरतुल्य पूत्र, ९व्या रात्री गमन केले असता सूभग कन्या. १०व्या रात्री श्रेष्ठ पूत्र, ११व्या रात्री अधर्म करणारी कन्या, १२ पुरुषश्रेष्ठ, १३व्या रात्री वर्णसंकर करणारी कन्या. १४ धर्मवेत्ता कृतज्ञ पुत्र, १५ पतिव्रता कन्या, १६ सुखी पुरुष. असे सोळा रात्रीत गमन (संभोग) केला असता फळे सांगितली आहेत. ज्या नक्षत्री गर्भधारणा होते, त्याच्या दहाव्या नक्षत्री बालकाचा जन्म होतो.
       मूळ नक्षत्रापासून दहावे नक्षत्र अश्विनी. मघापासून १०वे नक्षत्र मूळ, रेवतीपासून दहावे नक्षत्र आश्लेषा. ही तीन नक्षत्रे जन्माला एकापेक्षा एक वाईट अशी आहेत.
हे सुप्रजानिर्माण शास्त्राचे गुढ रहस्य आहे. 
जर संस्कारानुरुप होमविधरपूर्वक गर्भाधान संस्कार केला नाही तरी लग्नसंस्कार झाल्यापासून ऋतुकालाचे योग्य दिवस निवडून आपल्या इष्टदेवता कुलदेवतांचे स्मरण करुन पत्नीच्या उजव्या बाजूच्या नाकपूडीत दूर्वा रस पिळतात. नाकावाटे पोटात रस जाणे यामागे आयुर्वेदिय उपचार असेल किवा दूर्वा ही वनस्पती सहज मिळणारी, यश देणारी आहे. सुख देणारी अश्वगंधा किवा दूर्वा रस पिळण्यास सांगितली आहे.
       आपल्या संस्कारात सुद्धा प्रत्येक संस्काराची बांधणी योग्य रितीने केली आहे.
       आता गर्भाधान संस्काराचा विचार केला तर प्रथम विवाहसंस्काराकडे जावे लागेल. विवाह झाला नववधू घरी आली. एकतर घरात ती नविन, सर्व माणसे नविन, तिला या घरात ओळखीचे वातावरण समजून घेण्यास सर्वांचा विश्वास संपादन करण्यास वेळेची गरज असते.
       काहि ठीकाणी गर्भाधान संस्कारात फळांची ओटी भरणे हा कार्यक्रम असतो. ऋतुकाल प्राप्त होतो. नंतर ओटी, दूर्वा रस या सर्व सोपस्कारात तात्वीक विचार केला असता २०ए २१ दिवसांचा कालावधी सहज जातो. या कालावधीत ओळख, विश्वास, सामंजस्य वाढते. व वरील संस्कार दोघांच्याही साहचर्याने निर्भयपणे होतो.