Sunday 1 January 2012

विद्यारंभ (अक्षरारंभ संस्कार)

विद्यारंभ (अक्षरारंभ संस्कार)   पांचव्या वर्षी उत्तरायणसमयी अक्षर लिहीण्याचा प्रारंभ करावा. आई-वडील-मुलासह सर्वांनर मंगलस्नान करुन इष्टकुलदेवतांचे स्मरण करुन या मुलाला सकल विद्या विशारद होणेकरिता गुरुजवळ विद्या प्राप्त होणेसाठी आज अक्षरारंभ संस्कार करतो.
    विधीप्रमाणे केल्यास गणपतीपूजन पुण्याहवाचन करावक.
    तांदुळाच्या पुंजीवर किवा सुपारीवर विघ्नेशाय नमः, लक्ष्मीनारायणाभ्यां नमः, कुलदैवतायै नमः, सरस्वत्यै नमः असे म्हणून देवतांचे आवाहन पूजन करावे. आपल्या गुरुंची पूजा करावी.
      सर्व देवतांना नमस्कार करुन अक्षरारंभ करावा.

चौल संस्कार
    आयुष्य, बल, तेज यांची वृद्धी व्हावी म्हणून हा चौलकर्म (शेंडी ठेवणे) संस्कार करतात. हा संस्कार ३,,५ वर्षी करावा. हल्ली बहुधा मुंजीच्या वेळी हा विधी करतात.
    गर्भाधान संस्कारापासून चौल संस्कारापर्यंतच्या संस्कारांचा लोप होऊन त्याचा काल गेला असल्यास व्याहर्त होम करून कर्म करावे.
   हा संस्कार तिसरे, चौथे किवा पाचवे वर्षी किवा मौजीबरोबर चौल संस्कार करावा.
   आर्यांचे मुख्य चिन्ह शिखा व यझोपवित आहे. यझोपवित धारणाच्या संस्कारास उपनयन म्हणतात. हे दोनही संस्कार ब्राम्हणवर्गात चालू असून दोनही एकदम करण्यात येतात.
   अशाप्रकारे गर्भाधानापासून चौल संस्कारापर्यंत सर्व संस्कार किवा काही ठराविक संस्कार वेगवेगळ्या स्वरुपात रुढी परंपरा देशाचार प्रमाणे आजही झालेले दिसून येतात.

No comments:

Post a Comment