Thursday 14 July 2011

पुंसवन , अनवलोभन , सीमंतोन्नयन संस्कार

पुंसवन - पुमान म्हणजे वीर्यवान (बलवान) संतती ज्या संस्काराच्या योगाने होते त्याला पुंसवन म्हणतात.
हा संस्कार गर्भाचे स्पष्ट ज्ञान झाल्यावर २,,६ किवा ८ यातून कोणत्याही महिन्यात करावा.
किवा सिमंतोन्नयन संस्काराबरोबर करावा. यामध्ये अनवलोभन संस्कार मध्ये येतो. तो ही काहीजण करतात. सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे उपसंस्कारातील संस्कार समजावा. माझ्या पत्नीचे ठिकाणी उत्पन्न होणार्‍या सर्व गर्भांचे बीजासंबंधी व गर्भांसंबंधी देवांचा परिहारपुर्वक पूरुष देवतेच्या ज्ञानोदयाच्या प्रतिबंधकाचा परिहार व्हावा म्हणून पुंसवन संस्कार व अनवलोभन संस्कार तसाच माझ्या पत्नीचे ठिकाणी गर्भाची वृद्धी होण्यास प्रतिबंध करणार्‍या मांस, रुधिरप्रिय असणार्‍या राक्षसींच्या समुदायांचा नाशपूर्वक क्षम व सकल सौभाग्याचे मुलकारण महालर्क्ष्मीच्या प्रवेशद्वाराने प्रत्येक गर्भामध्ये बीज आणि गर्भ यांपासून उत्पन्न होणार्‍या पापांचा नाश करणार्‍यांचा अतिशयद्वाराने स्त्रीसंस्काररुप सीमंतोन्नयन नावाचा संस्कार असे पुंसवन, अनवलोभन, सिमंत असे तीनही संस्कार करतो.
अनवलोभन - अनवलोभन म्हणजे पतन ते न होणे म्हणजे अनवलोभन म्हणजे गर्भपतन न होऊ देणे आहे. म्हणून पुंसवन व अनवलोभन हे संस्कार पहिल्या गर्भाचे केले तथापि हे गर्भसंस्कार असल्यामुळे दर एक गर्भाचेही करावे. पुंसवन, अनवलोभन संस्कारामुळे तीन हेतु साध्य होतात.
१) गर्भ बलवान होतो. २) गर्भपात होत नाही. ३) बालक पूर्ण दिवस झालेनंतर जन्माला येते.
सामंतोन्नयन - मस्तकातील पंचसंधीस सीमंत म्हणतात. त्याचे रक्षण करण्याकरिता हा संस्कार आहे.
मस्तकातील मानसीक शक्तीवर प्रभाव पाडण्यासाठी चांगला आचार विचार आवश्यक आहे.
गर्भवती स्त्रीचे आचार आहाराचे प्रतिबिब गर्भस्थ बालकावर पडते. गर्भस्थ बालकाचे मन दृढ करण्याकरितागर्भवतीचे मन दृढ व शांत केले पाहिजे. एकंदरीत आपणाला जसा बालक पाहिजे तसे गर्भवतीचे मन केले पाहिजे. गर्भवतीचे मनाच्या विचाराने संस्काराने युक्त असे बालकही त्या मनाच्या संस्काराने युक्त होईल.
गर्भवती आपले शारीरीक व मानसिक सर्व शक्ती गर्भस्थ बालकाला देऊ शकते. म्हणून गर्भस्थ बालक विशेष सामर्थ्यवान करुन त्याची काया पालटण्याचे गर्भवती हे एक मोठे साधन आहे.
लौकीक दृष्टीने शालेय शिक्षणाने मुलाच्या शिक्षणाचा आरंभ होतो. परंतु संस्कार/शिक्षण हे गर्भात असल्यापासून चालू असते.
       वरील तीनही संस्कारात होमद्वारा प्रजापती, धाता, राका, विष्णू, प्रजापती अशा देवतांना संतुष्ट केले जाते.
कुलपरंपरेनुसार माहेरची, घरची ओटी भरणे, फुले माळणे अशाप्रकारचे कार्यक्रम केले जातात.
८व्या महीन्यात *विष्णूबली* नामक संस्कारही आहे. सुलभ प्रसूतीसाठी हा संस्कार केला जातो.

No comments:

Post a Comment