Wednesday 3 August 2011

वर्धापन संस्कार (वाढदिवस)


वर्धापन संस्कार (वाढदिवस)
       ज्या दिवशी जन्म झाला त्या दिवसाला वाढदिवस असे म्हणतात. वाढदिवसाचा विधी करणे तो वर्षपर्यंत दर एक मासिक जन्मतिथीचे  दिवशी करावा. वर्षांनंतर दरएक वर्षी जन्मतिथीचे दिवशी करावा. जन्मतिथी दोन दिवस असेल तर ज्या दिवशी जन्मनक्षत्राचा योग असेल ती घ्यावी. दोन दिवस जन्मनक्षत्राचा योग असेल किवा दोनही दिवशी  नसेल तर सुर्योदयकाल व्यापिनी अशी चार घटिकाहून अधिक असेल ती घ्यावी. चार घटिकाहून कमी असल्यास पूर्व दिवसाची घ्यावी. जन्ममास अधिकमास आला असतां शूद्धमासात दरएक वर्षाचा वर्धापनविधी करावा, अधिकमासात करु नये.
       आपल्या इष्ट, कुल देवतांची यथायोग्य आठवण करुन मार्कंडेय पूजन करावे. सप्तचिरंजीव, अश्वत्थामा, बली, व्यास, हनूमान, विभिषण, कृपाचार्य, परशुराम, मार्कंडेय यांचे स्मरण तरी करावे.
बालकाला मंगलस्नान करवून तिलकधारण नवीन कपडे वगैरे धारण करुन वरील पूजा करावी. देवतांना नैवेद्य करुन बानकास तिल, गूडयुक्त दूध प्राशन करवावे.
औक्षण करवावे.
विधियुक्त करणे झाल्यास संकल्पपूर्वक पूण्याहवाचन, वरील देवतांचे पूजन तसेच आयुष्यवृद्धीकरिता दूर्वाहोम वेगैरे करावा.

No comments:

Post a Comment